Sunday, 4 August 2019

*जूनी पेन्शनसाठी हे केल, ते केल! आता हे करु, ते करु...*


*जूनी पेन्शनसाठी हे केल, ते केल! आता हे करु, ते करु...*


✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

*आपला इतिहास व भूगोल सांगणाऱ्या व पेन्शनसाठी खरोखर झटणाऱ्या (दिखावा नाही हं...) कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी उद्या दि. ०६ ऑगस्ट रोजी लातूर कर्मचारी समन्वय समिती बैठकीस अवश्य उपस्थित रहावे.*
         
    _आम्ही कधीच टिकात्मक बोलत नाही, वास्तव मांडतो. परंतु जर ते कोणाला झोंबत असेल तर आम्हाला त्याची पर्वा नाही._

    _आज प्रत्येक संघटना जूनी पेन्शनचा विषय घेऊन विविध आंदोलने, मोर्चे किंवा दिन आपापल्या परीने साजरे करीत आहेत. वेगवेगळे बॅनर पाहून व रोजचेच *साजरीकरण* पाहून आमचीही मानसिकता 'रोज मर त्याला कोण रड' अशी बनू लागलीय. परंतु याच संघटना जेव्हा - केव्हा एकत्रितपणे लढण्याची वेळ येते तेव्हा दूरदूर पर्यंत दिसत नाहीत, अस का होत ? हा न उलगडलेला अनुत्तरीत प्रश्न आहे._
         _तुम्ही म्हणाल, हे असे बिनबूडाचे बोलू नका. परंतु याला आत्ताचाच एक पूरावा देतो. दि.०३ जूलै रोजी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी दिन साजरा करावयाचा होता. त्यासंदर्भाने २-३ दिवस अगोदर नियोजन करुनही मोजक्याच कर्मचारी संघटनांनी सक्रीय सहभाग नोंदवला. बरे, जर तेथे येणे शक्य नसेल तर आपापल्या कार्यालयात मधल्या सुट्टीत घोषणा देऊन लक्षवेधी दिन साजरा करायच्या सूचना होत्या. *किती संघटनांच्या ‍यांनी हा दिन साजरा केला, हे आम्ही विसरलो नाही. तुमची जूनी पेन्शन बाबतची तळमळ आम्हाला तिथेच समजली.*_
       _आणि जर गर्दी जमलेले आंदोलन असेल तर तेथे पाठींबा देण्यासाठी चढाओढीने हातातील माईक हिसकावणाऱ्या पदाधिकार्‍यांची गर्दीही याच डोळ्यांनी पाहिलीय._
         *तुम्हाला वाटत असेल की हे टीका करीत आहेत. परंतु हे वास्तव आहे, आणि याच वास्तवाने कर्मचारी संघटनांचे कंबरडे सध्या मोडलेले आहे. आणि तरुण कर्मचारी वर्ग यांच्याकडे पाठ फिरवतोय. याबद्दल आपल्या मनात कोठेही किंतू किंवा शंका असतील तर मला अवश्य कॉल करु शकता.* मला माहिती आहे, आपला लढा मस्तवाल शासनाशी आहे, संघटनांशी मूळीच नाही. परंतु किमान यामुळे तरी यावेळी आपापसातील मतभेद / मनभेद बाजूला ठेऊन आपले पद / मोठेपणा बाजूला ठेऊन दि.२० ऑगस्टच्या संपाच्या नियोजनाच्या दृष्टीने होणार्‍या बैठकीस स्वयं प्रेरणेने याल. कारण जोपर्यंत माणसाच्या स्वाभिमानावर ठेस लागत नाही, तोपर्यंत माणूस पेटून उठत नाही. त्यासाठी आता कोणाच्याही फोनची वाट न पाहता यावे लागेल, कारण तुम्ही आलो तर तुमच्या संघटनेला भविष्य असेल आणि नाही आलात तर फक्त इतिहासच असेल. 

🎯 *कर्मचारी समन्वय समिती बैठक लातूर*
⛳ *प्रशासकीय इमारत, जूने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर* 
🕺🏻 *दि. ०६ ऑगस्ट २०१९ मंगळवार सायंकाळी ०५.०० पासून...*

(टिप - मध्यवर्ती कर्मचारी संघटनेकडून बैठकीनंतर भोजनाची व्यवस्था केली आहे.)

👊🏻 *एकच मिशन, जूनी पेन्शन* 

आपला सर्वांचा लहान भाऊ...
तानाजी सोमवंशी ९०१११०४४६४
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लातूर

Saturday, 13 July 2019

दि.१३ जुलै रोजी "ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर" येथे उत्साहाने पार पडलेल्या बैठकीत खालील निर्णय एकमुखाने घेण्यात आले.

🎯 *MRJPHSL जिल्हा बैठक वृत्तांत -*

_दि. १३ जुलै रोजी "ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर" येथे उत्साहाने पार पडलेल्या बैठकीत खालील निर्णय एकमुखाने घेण्यात आले._

1⃣. दि.२० जुलै २०१९ रोजी जिल्हा परिषद, लातूर येथे संघटनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धरणे आंदोलनासाठी विविध कामांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे समित्या असतील.

👉 *परवानगी व निवेदन समिती-* सचिन चव्हाण सर, इस्माईल शेख सर,  दिनेश नरवणे सर, मोरे विजयसिंह सर

👉🏻 *पेंडॉल, साऊंड व बॅनर समिती -* मतीन अब्बासी सर, भिमाशंकर मोहारे सर, तुळशीदास धडे सर, संकेत गिरी सर, परमेश्वर रोळे सर.

👉🏻 *आंदोलनासंदर्भात सोशल मिडीयाद्वारे प्रसिद्धी समिती -* नागनाथ सुरवसे सर, शशिकांत नाबदे सर, बस्वराज नन्ना सर, बालाजी मोतेवाड सर, श्रीकांत हळ्ळे सर.

👉🏻 *मिडीया कव्हरेज समिती -*
तानाजी सोमवंशी सर, इस्माईल शेख सर, विजयसिंह मोरे सर, हणमंत केंद्रे सर, संतोष पाटील सर, माधव होनराव सर, लक्ष्मण बेंबडे सर, प्रताप माने सर.

   _वरील समित्यामधील शिलेदार हे पुढाकाराने काम करतील. त्यांना कोणत्याही बाबतीतील सूचना किंवा सहकार्य सर्वांनी करावे असे अपेक्षित आहे._

2⃣ पुढील मंगळवार १५ तारखेपर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर आंदोलन संदर्भाने तालुका कार्यकारणीने बैठकीचे नियोजन करावे. बैठकीनंतर शाळाभेटीचे नियोजन देखील तालुका कार्यकारणीने करुन त्याचा अहवाल जिल्हा कार्यकारणीस देण्यात यावा. प्रत्येक तालुक्याच्या बैठकीस जिल्ह्याहून खालीलप्रमाणे किमान दोन जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीसंदर्भात व इतर बाबतीत त्यांच्याशी चर्चा करण्यात यावी.

*लातूर - श्रीकांत मुसणे सर, दिनेश नरवणे सर, अर्जुन चव्हाण सर.*

*औसा - महादेव गुजरे सर, शरद पांचाळ सर, अजित चव्हाण सर.*

*निलंगा - राहूल रोकडे सर, संकेत गिरी सर, लक्ष्मण बेंबडे सर.*

*देवणी - नागनाथ सुरवसे सर, परमेश्वर रोळे सर, शशिकांत नाबदे सर*

*उदगीर - तानाजी सोमवंशी सर, विकी यलमट्टे सर, भिमाशंकर मोहारे सर.*

*जळकोट - मदन बिरादार सर, प्रसादसिंह बयास सर, गोविंद पतंगे सर*

*अहमदपूर - सचिन चव्हाण सर, माधव होनराव सर, ज्ञानेश्वर गवरे सर.*

*चाकूर - इस्माईल शेख सर, नवनाथ जाधव सर, प्रताप माने सर*

*रेणापूर - तुळशीदास धडे सर, सिध्देश्वर बैकरे सर, दत्ता यादव सर*

*शिरूर अनंतपाळ - मोरे विजयसिंह सर, लिंबराज माने सर, विवेक पाटील सर*

3⃣. आंदोलनासाठी लागणारा निधी पेन्शन दिंडी लढा निधीतील जिल्ह्याला शिल्लक निधीतून खर्च करण्यात यावा.

4⃣. २० ऑगस्ट एकदिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांची समन्वय समिती स्थापण करण्यात व बैठक घेण्याचे नियोजन सचिन चव्हाण व मोरे विजयसिंह यांनी २० जुलै नंतर करावे.

5⃣. जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून भिमाशंकर मोहारे व जिल्हा संघटक म्हणून श्रीकांत मुसने यांची निवड करण्यात आली.

           _सदरील बैठकीस मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण सर,  जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी सर, जिल्हा सचिव Vijaysinh More सर,
सोशल मिडीया प्रमुख Nagnath Surwase सर, लातूर तालुका अध्यक्ष Matin Abbasi सर, औसा तालुका अध्यक्ष Mahadev Burande सर,
लातूर शहराध्यक्ष Pratap Mane सर, औसा तालुका सरचिटणीस Mahesh More सर, औसा शहर सरचिटणीस Basavraj Nanna सर, लातूर तालुका कार्याध्यक्ष Ajit Chavan सर, निलंगा तालुका सल्लागार Santosh Suryawanshi सर, निलंगा पेन्शन टीमचे लढवय्ये शिलेदार Sainath Anmod सर आदी पेन्शन शिलेदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


🌪 *२० जूलैला पाऊस मुसळधार असो की गारा असो...*
*चर्चा तर फक्त आमचीच होणार !*

👊🏻 *भव्य धरणे आंदोलन* 👊🏻
⛪ *जिल्हा परिषद, लातूर* ⛪
⏰ *दूपारी ०२ ते ०५ पर्यंत*  ⏰

🤝🏻 *आपलीच समस्त पेन्शन हक्क संघटन लातूर...* 🤝🏻

Saturday, 29 June 2019

सातव्या वेतन आयोगाची सर्वच थकबाकी रोख हवी !

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*सातव्या वेतन आयोगाची सर्वच थकबाकी रोख हवी !*

💵💵💵💵💵💵💵💵💵💵
_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूरच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमुखी निर्णय..._
🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪


```आज केशवराज विद्यालय, लातूर येथे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत बोलावलेली विशेष बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये जिल्ह्यातून असंख्य DCPS धारक बंधू उपस्थित होते. सर्वांच्या चर्चेतून खालीलप्रमाणे एकमुखी निर्णय घेण्यात आले.```

☝🏻 ```कोणत्याही परिस्थितीत सातव्या वेतन आयोगातील जानेवारी 2016 पासूनचा   DCPS धारकांचा फरक रोखीनेच मिळाले पाहिजे.```

☝🏻 ```प्रमाणित खाते नंबर नसणे, एकाच कर्मचाऱ्याचे तीन खाते नंबर असणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचार्‍यांचे खाते नंबर नसणे, बऱ्याच DCPS धारकांचे खाते नंबरच नसणे, अशा असंख्य त्रुटी आहेत.```

☝🏻 ```त्यामुळे जून २०१९ च्या मासिक वेतन देयकासोबत ७ व्या वेतन आयोगातील फरक DCPS खात्यावर जमा करण्यास नकार द्यायचा.```

☝🏻 ```प्रशासन सहकार्य करण्यास तयार नसल्यास त्याविरोधात आंदोलन पुकारले जाईल.```

☝🏻 ```दुष्काळी निधीसाठी एक दिवसाच्या पगार कपातीस लातूर जिल्ह्यातील सर्व DCPS / NPS धारक कर्मचारी व वरिष्ठ कर्मचारी बहिष्कार टाकतील. सदरील रक्कम कै. गोविंद शिरमवार सर यांच्या चिमुकलीच्या नावे मदतनिधी म्हणून जिल्ह्याच्या वतीने जमा करण्यात येईल.```

☝🏻 ```दि.०३ जूलै रोजी जूनी पेन्शनसाठी लक्षवेधी आंदोलन करुन त्याचा सोशल मिडीयावर प्रसार प्रचार करणे.```

☝🏻 ```चटोपाध्याय प्रस्तावाचे कार्य व अर्धनग्न आंदोलनातील सहभागासाठी जिल्हा टीमचे अभिनंदनपर ठराव संमत करण्यात आला.```


सदरील बैठकीस संघटनचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांच्यासह जिल्हासचिव मोरे विजयसिंह, सोशल मिडीया प्रमुख नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष महादेव गुजरे, सहकार्याध्यक्ष शरद पांचाळ, चाकूर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे, निलंगा तालुकाध्यक्ष राहूल मोरे यांच्यासमवेत जिल्ह्यातील बहुसंख्य पेन्शन शिलेदार उपस्थित होते.
        *सदरील बैठकीस आपल्या अमुल्य वेळ काढून संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहिलेल्या सर्व शिलेदारांचे मनपुर्वक आभार !!! मात्र काही कारणामुळे बैठकीस न येऊ शकलेल्या शिलेदारांची जबाबदारी असेल की त्यांनी सातव्या वेतन आयोगाची DCPS थकबाकी जून महिन्यातील बीलात मागवू देऊ नये. यासंदर्भातील प्रशासनाचे सविस्तर पत्र सोमवारी येईलच. तसेच जिल्हा परिषद भेटीचे सर्व अपडेट्स उद्या देण्यात येतील.*


~तोपर्यंत सर्वांना शुभरात्री !!!~
~मात्र पेन्शन मिळेपर्यंत आपणास सरकारची झोप उडवायची आहे, हे पक्के लक्षात ठेवा !!!~

✍🏻 *श्री. नागनाथ सुरवसे सर*
_जिल्हा सोशल मिडीया प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूर_