Saturday, 19 January 2019

रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क*
 *संघटन रेणापूर जिल्हा लातूर*
   रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार व सहविचार सभा उत्साहात संपन्न
          👊🏻 *_सर्व विभाग समाविष्ट असणारी लातूर जिल्ह्यातील पहिली तालुका कार्यकारिणी..!!!_*
सदरील बैठकीतील निवडी खालील प्रमाणे👇🏻
*●तालुका सरचिटणीस-श्री.मारुती खरटमोल सर(शिक्षण विभाग)*
*●कार्याध्यक्ष-श्री.रमेश आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*●कोषाध्यक्ष-श्री.गणेश इस्थळकर साहेब(ग्रामसेवक)*
*●उपाध्यक्ष-भुसणर डी.बी.साहेब(तलाठी महसूल विभाग)*
*●प्रसिद्धी प्रमुख-श्री.प्रमोद कटके सर(शिक्षण विभाग)*
*●संघटक-सुंदर कदम सर (खाजगी संस्था)*
*●महिला आघाडी प्रमुख -देशमुख एस.एम.मॅडम*
*●मार्गदर्शक-श्री.कुलूलवाड सुरेश सर*
*●सल्लागार-दुड्डे प्रेमराज सर*
         
      सदरील बैठकीसाठी *श्री.अमोल शेळके(विश्वस्त),सचिन चव्हाण(विभागीय उपाध्यक्ष),तानाजी सोमवंशी(जिल्हाध्यक्ष), तुळशीदास धडे (सरचिटणीस),इस्माईल शेख(कार्याध्यक्ष),राहुल रोकडे(कोषाध्यक्ष),शशिकांत नाब्दे (सोशल मीडिया प्रभारी)हे उपस्थित होते.*

*👉🏻नवीन पेन्शन योजनेचे तोटे कसे आहेत याची आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी श्री दत्तात्रय रत्नपारखे सर यांनी केली.*

■विशेष उपस्थिती 👇🏻
*◆के.बी.बनसोडे साहेब(कार्यालयीन अधीक्षक,कृषी विभाग)*
*◆तिडके साहेब (तालुकाध्यक्ष तलाठी संघटना)*
*◆औसेकर साहेब(तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना)*
*◆आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*◆कोरे साहेब(तालुकाध्यक्ष  कास्ट्राईब संघटना)*
*◆करवंजीकर साहेब(अकाऊंट विभाग तहसील रेणापूर)*
*◆फुटाणे साहेब(तालुकाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना)*
          विशेष म्हणजे वरील सर्व संघटनेचे पदाधिकारी हे dcps/nps धारक असून आपापल्या संघटनेचे नेतृत्व करतात.
*सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस मारुती खरटमोल यांनी केले.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
आपलेच 🙏🏻
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रेणापूर जिल्हा लातूर*

२३/१० च्या जी.आर. लवकरच रद्द करु


"२३/१० च्या जी.आर. लवकरच रद्द करु" शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे जूनी पेन्शन हक्क संघटन शिष्टमंडळाला आश्वासन

काल शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या वेळेनुसार सकाळी ठीक ०८.०० वाजेपासूनच पेन्शन हक्क संघटनचे शिलेदार "शासकीय विश्रामगृह, लातूर" येथे उपस्थित राहिले. विनोद तावडे साहेबांनी बरोबर ०८.३० ला भेटीसाठी आपल्या शिष्टमंडळाला पाचारण केले. यावेळी शिष्टमंडळाने विनोद तावडे साहेबांना २३/१० च्या वरीष्ठ वेतनश्रेणीचा शासन निर्णय रद्द करण्याचे निवेदन दिले. व त्याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी साहेबांनी हा शासन आदेश रद्द करु असे आश्वासन दिले. यावेळी "साहेब, अशी आश्वासने आम्हाला पुष्कळ मिळाली, मात्र महाराष्ट्रातील समस्त शिक्षक अजूनही शासन निर्णयाची वाट पाहतच आहेत." त्यावर शिक्षण मंत्र्यांनी सांगितले,"आता जास्त वाट पहावी लागणार नाही." असे उत्तर दिले.
       सदरील भेटीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण सर व जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी केले. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे सर, रेणापूर तालुकाध्यक्ष अरुण जांभळे, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे सर, जिल्हा कोषाध्यक्ष राहुल रोकडे सर, जिल्हा संघटक परमेश्वर रोळे सर, जिल्हा प्रतिनिधी दिनेश नरवणे सर, दत्ता यादव सर, मोरे विजयसिंह सर, दत्तात्रय बेद्रे सर, संतोष सुर्यंवशी सर आदि पेन्शन फायटर उपस्थित होते.

१८ जानेवारी जिल्हा बैठक वृत्तांत

☝🏻 *बैठक वृत्तांत...* ☝🏻

*_महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लातूर_*

_दि.१८ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने पूढील निर्णय घेण्यात आले._

```१. कै. बंडू वाघमारे सर यांच्या मदतनिधीचा आढावा घेऊन त्यासाठी आणखी प्रयत्न करावे.```

```२. उर्वरित तालुक्यांनी लवकरात लवकर तालुका विस्तार व आंदोलनासाठी तालुकास्तरीय बैठक आयोजित कराव्यात.```

```३. ज्या तालुक्यांना त्यांच्या अंतर्गत शहरासाठी कार्यकारणी करायची असेल त्यांना अशी कार्यकारणी करायची परवानगी असेल. सदरील कार्यकारणीस तालुका कार्यकारणी नियुक्ती देईल व शहर कार्यकारणी तालुका कार्यकारणीच्या नियंत्रणात व नियोजनात कार्य करेल.```

```४. सर्व तालुका कार्यकारणींनी सर्व लेखी अभिलेखे ठेवावीत, त्यासाठी "कार्यालयीन सचिव" पद नेमण्यात यावे.```

```५. "ट्विटर वार"ला आणखी गती देऊन त्याचा तालुकावार आढावा घेण्यात आला. प्रत्येक शिलेदारास वैयक्तीक मार्गदर्शन करुन प्रत्येक शिलेदाराने दररोज ३ tweet करावेत.```

```६. २७ जानेवारीचे हल्लाबोल आंदोलन हे जनआंदोलन होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.```

```७. ३ फेब्रुवारीच्या अमरावती अधिवेशनासाठी जाणाऱ्यांसाठी २ फेब्रुवारीला पहाटे ०४.०० वाजता लातूर येथून ट्रेन असून त्याची बुकींग उपलब्ध आहे. इतरांनी तालुका / केंद्र स्तरावर नियोजन गाड्यांचे नियोजन करुन तालुका कार्यकारणीस कळवावे.```

*_तुमचे, माझे, सर्वांचे हक्काचे संघटन_*
*_महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटन_*
~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sunday, 13 January 2019

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं...

*सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं...*
                        🚩
▂▃▄▅▆▇█▓▒▒▓█▇▆▅▄▃▂

*महाराष्ट्र राज्य जूनी हक्क संघटन परिवार लातूर...*

~*आपले आभार, धन्यवाद, शुक्रीया, Thank you...*~ 🙏🏻🙏🏻🙏🏻

         जूनी पेन्शनची ज्वलंत मागणी घेऊन लढणारे आपण सर्व पेन्शन शिलेदार...
        आपण सर्वांनी मिळून लोकशाही पध्दतीने *"लातूर जिल्हाध्यक्ष"* पदी बिनविरोधपणे निवड केली, त्याबद्दल सर्वांचे आभार...
      मागील दोन - तीन वर्षापासुन आपण सातत्याने हा विषय घेऊन लढत आहोत. विविध ऐतिहासीक आंदोलने, मोर्चे काढून आपण आपली मागणी शासन दरबारी मांडत आहोत. पुढील निवडणूका लक्षात घेता आपणास आता हा लढा विविध पातळीवर तीव्रपणे लढायचा आहे.

       ध्यानी मनी नसताना ऐन मोक्याच्या वेळी मोडकळीस आणल्या गेलेल्या जहाजेचा कप्तान मला बनवलात! आणि आता आपणा सर्वांना आमच्या या नवीन टीमकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, याची जाणीव आहे. मागील ५-६ महिन्यातील मरगळ झटकून दुप्पट जोमाने काम करु, ही हमी देतो. तसेच यापूढील प्रत्येक कार्यास आपणही भरभरुन प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
       _यापुढे माझा प्रत्येक शिलेदार अध्यक्ष असेल. आपण आपल्या लढ्यासाठी काही सुचना किंवा प्रतिक्रिया असतील तर मला 📞 करा, योग्य सुचना नक्कीच सर्वजण मिळून राबवू..._ 🙏

~याकामी सहकार्य केलेले सर्व राज्य निरीक्षक, राज्य/विभाग पदाधिकारी, सर्व वरीष्ठ संघटना पदाधिकारी, हितचिंतक आणि सर्वात महत्वाचे लातूर जिल्ह्यातील सर्व पेन्शन शिलेदार यांचे मनस्वी आभार...~

*तुमच्या, माझ्या, सर्वांच्या हक्काचे संघटन*
*महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन*

(क्षमस्व, आपण सर्वजण फोन ट्राय करत असाल परंतु मोबाईल प्रॉब्लेममुळे तो बंद आहे. लवकरच फोन नंबर सुरु होईल. 🙏)

आपल्यासारखाच एक पेन्शन शिलेदार
  *तानाजी सोमवंशी* ९०१११०४४६४
*महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन, लातूर*

लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन

🙏🏻🎯🎯🎯🎯🎯🎯🙏🏻
*लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन*
💐💐💐💐🌹🌹🌹🌹

*लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन करणेसाठी, प्रत्येक तालुक्यात  दि 29/12/2018 वार शनिवार रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठक घेऊन तालुका कार्यकारिणी पुनर्गठन व  दोन जिल्हा प्रतिनिधींची निवड करण्यात आली.*

 तालुका कार्यकारिणी निरीक्षक म्हणून *अमोल शर्मा विभागीय कार्याअध्यक्ष औरंगाबाद,सकोळे सर ,दत्तात्रय पिनाटे तालुका सहचिटणीस मुखेड संजय गांभीरे. (विश्वस्त), डोईजड सर- तालुका अध्यक्ष मुखेड, पाटील सर- जिल्हा प्रवक्ते नांदेड ,विकास घोडके राज्य समन्वयक उस्मानाबाद,रामेश्वर विभुते जिल्हा संपर्क प्रमुख कोल्हापूर भालचंद्र आळंदकर (राज्य प्रसिध्दी प्रमुख) बाळासाहेब शिंदे यांनी काम पाहिले* 
*यां सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन व धन्यवाद.*
💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



*आज दिनांक 30/12/2018 रोजी लातूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन साठी  संत गोरोबाकाका  विद्यालय लातूर  या ठिकाणी बैठक संपन्न झाली. यामध्ये पुढील प्रमाणे नवीन जिल्हा कार्यकारणी पुनर्गठित करण्यात आली.*

*जिल्हाध्यक्ष - तानाजी सोमवंशी*

*जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे*

*जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल शेख*

*जिल्हा कोषाध्यक्ष राहुल रोकडे*

*जिल्हा सल्लागार ज्ञानेश्वर गवरे*

*जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण बेंबडे*

*जिल्हा मीडिया प्रमुख शशिकांत नाबदे*

*जिल्हा मुख्य संघटक परमेश्वर रोळे*

*जिल्हा उपाध्यक्ष - अर्जुन चव्हाण
                           महादेव गुजरे                 
                          पांडुरंग येलमटे
                          मदन बिरादार

 यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

नवनियुक्त सर्वच पदाधिकऱ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
🌹🌹🌹🌹💐💐💐💐

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेल्या सर्वच आयोजकांचे तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेले सचिन चव्हाण सर व प्रवीण गिरी सरांचे मनपूर्वक धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

              आपलेच

*श्री.अरविंद पुलगुर्ले(राज्य सहसचिव )*

*श्री.भालचंद्र आळंदकर (राज्य प्रसिध्दी प्रमुख)*

*श्री. पाचमासे सिकंदर (विभाग अध्यक्ष, औरंगाबाद)*

*श्री. प्रवीण गिरी (प्रशासक तथा राज्यसमन्वयक ,लातूर)*

*श्री.सचिन चव्हाण (विभाग उपाध्यक्ष, औरंगाबाद)*

*श्री.अमोल शेळके विश्वस्त*

 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

... आणि पंकजा ताईंची भेट झाली

*... आणि पंकजा ताईंची भेट झाली*








हो...
_तब्बल 7 तासाच्या प्रतिक्षेनंतर ताईंशी पेन्शनच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा..._

_ठिकाण - डॉ.रमेश आप्पा कराड यांचे निवासस्थान, MIT कॉलेज, लातूर_

_वेळ - रात्री १२.३० वाजता_

========================
*_ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले_*

*_ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है_*
========================

*"पंकजाताई मुंढे पालवे"* या लातूर दौर्‍यावर येत आहेत, असे सकाळी ११.०० वाजता समजताच _'आज त्यांची भेट घ्यायचीच'_ असा निश्चय करुन भेटीसाठी वेळ मिळवण्याचे नियोजन करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर टाऊन हॉल मैदानावर भेटीसाठी वेळ मिळाला. मात्र तेथील प्रचंड गर्दी व व्यस्त कार्यक्रम यामुळे केवळ धावती भेट मिळत होती. परंतु फक्त धावत्या भेटीवर समाधान मानतील ते पेन्शन फायटर कसे ? तात्काळ तेथून काढता पाय घेऊन पूढील नियोजनास लागलो. आम्हाला चर्चेसाठी कमीत कमी १०-१५ मिनीटे तरी वेळ हवा, अशी विनंती करताच कळविण्यात आले की रात्रीचे १० ते ११ वाजतील. मात्र लातूरपासून ३०-४० किमी. अंतरावरुन आलेले शिलेदार मागे हटले नाहीत. शेवटी डॉ.रमेश आप्पा कराड यांच्या निवासस्थानी जाऊन कडाक्याच्या थंडीत ऊबदार शेकोटीचा आनंद घेत प्रतिक्षा केली.
      _ठिक ११.०० वाजता तेथे ताईंचे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या विश्वासू टीम व लातूर जिल्ह्यातील सर्व मोठे पदाधिकारी, आमदार यांचेसह जेवण व्यवस्था मिळाली. आणि तद्नंतर ज्यासाठी अट्टाहास केला ती *#ग्रेट_भेट* मिळाली. जूनी पेन्शन, शिक्षण सेवक मानधन वाढ, बदल्यांचे धोरण याविषयी ताईंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याबद्दल सविस्तर पोस्ट लवकरच येईल._
         ~*सदरील भेटीसाठी डॉ. रमेश आप्पा कराड यांचे आभार तसेच सौ. ताईंचे विशेष आभार ज्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करुन प्रमख पाहुण्यांसह जेवणासाठी आग्रह केला. अशा व्यक्ती दुर्मिळच मिळतील.*~
        *सदरील भेटीसाठी तब्बल 7 तास प्रतिक्षा करणारे व केवळ फोटोसेशन न करता ताईंशी पेन्शनच्या मुद्द्यावर बोलणारच म्हणून अडून बसलेल्या सर्व पेन्शन फायटर्सच्या जिद्दीला सलाम! त्यात जिल्हा कोषाध्यक्ष राहुल रोकडे सर, विजयसिंह मोरे सर, संतोष सुर्यवंशी सर, निलंगा तालुकाध्यक्ष राहुल मोरे सर, चाकूर तालुकाध्यक्ष संतोष पाटील सर, उदगीर तालुकाध्यक्ष प्रताप सुरनर सर, सोशल मिडीया प्रभारी शशिकांत नाबदे सर, जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे सर व सर्वात विशेष शिक्षण सेवक मानधन वाढीविषयी व पेन्शन विषयी बोलल्याशिवाय हलणार नाही म्हणणारे शिक्षण सेवक व पेन्शन फायटर जाकीर शेख सर व मी तानाजी सोमवंशी सर आदि पेन्शन फायटर उपस्थित होते. सर्वांचे आभार...*

      *भेटीतील चर्चेसह लवकरच येऊ...*

*_कायम आपलीच, समस्त महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन परिवार लातूर_*

मयत DCPS बांधव बंडू वाघमारे सर यांचेसाठी मदतनिधी

📝📝 *_प्रसिद्धीपत्रक_* 📃📃📃
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶

*मयत शिक्षक श्री बंडू वाघमारे यांच्या कुटुंबाला मदतीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आवाहन* 🙏🙏

_दि.११ जानेवारी २०१९, लातूर. वार्ताहार_
      *श्री बंडू वाघमारे* मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा रेतु ता.जळकोट जि.लातूर हे दररोजच्या सवयीप्रमाणे पहाटे 5:15 च्या सुमारास फिरायला गेले असता अचानक लातूर निजामाबाद हायवेवर पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .काही कळण्याच्या आत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
       _श्री बंडू सर हे 2005 नंतर शासकीय सेवेत आल्यामुळे त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नसून त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचे कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार नाही. नुकतेच १० वर्षे पूर्ण झाल्याने नवीन शासन आदेशाने मिळणारे १० लक्षही त्यांच्या कुटुंबियांना मिळणार नाहीत. त्यांच्या पत्नीचे D.ed.असूनही त्यांना अनुकंपा लाभ नाही. किंवा ग्रॅच्युटीसुध्दा नाही._
           शेती नसलेल्या त्यांच्या घरात ते एकटेच कर्ते पुरुष होते. त्यांच्या वडीलांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्याने आता त्यांच्या पश्चात त्यांच्या वृध्द आई, गरोदर पत्नी व मुलाचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडले आहे.

 *अशावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना त्यांच्या मदतीला धावली आहे . पेन्शन हक्क संघटनेकडून आव्हान करण्यात येते की अशा संकटाच्या समयी आपल्या सर्वांनी मिळून बंडू वाघमारे यांच्या कुटुंबाला मानवतेच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.*

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मदतनिधीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे असेल तर आपण खालील खाते क्रमांकावर आपली मदत पाठवू शकता*

*======================*
*1. तानाजी उत्तमराव सोमवंशी*
*बँक ऑफ महाराष्ट्र, निलंगा जि.लातूर*
*खाते क्रमांक - 20229053567*
*IFSC Code - MAHB0001083*

*2. तुळशीदास रामकिशन धडे*
*स्टेट बँक ऑफ इंडिया, औसा रोड, लातूर*
*खाते क्रमांक - 30454415664*
*IFSC Code - SBIN0006303*
*••••••••••••••••••••••••••••••••••••*

        *जिल्हाध्यक्ष तथा सरचिटणीस*
_महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लातूर MRJPHS Latur_

लातूर जिल्हा बैठक नियोजन दि.१३ जानेवारी २०१८

🏷 *सहविचार सभा* 📢
*======================*

_लातूर जिल्ह्यातील सर्व dcps /nps ग्रस्त बांधवांना कळविण्यात येते की *लातूर जुनी पेन्शन हक्क संघटन* ची जिल्हा सहविचार सभा रविवार दि. १३ जाने २०१९ रोजी होणार आहे._

🏤 *जिल्हा परिषद प्रांगण, लातूर*

🕰 *सकाळी ठीक 10:00 वाजता*

*_सदरील बैठकीत पुढील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आयोजित करण्यात येईल._*
=======================

👉🏿 *२७ जानेवारी २०१९  रविवारच्या जिल्हास्तरीय आंदोलनाचे स्वरुप*
(मार्गदर्शन : श्री. प्रविण गिरी, राज्य समन्वयक, मराजुपेंहसं, लातूर)

👉🏻 *२७ जानेवारी मोर्चा नियोजन*
 (मार्गदर्शक : श्री. अमोल शेळके सर, विश्वस्त, मराजूपेहसं)

👉🏿 *२७ जानेवारीच्या आंदोलनात इतर सर्व विभागांचा/संघटनांचा सक्रीय सहभाग वाढवणे.*
(मार्गदर्शक:श्री. सचिन चव्हाण, विभागीय उपाध्यक्ष, मराजुपेंहसं, लातुर)

👉🏻 *तालुकावार संघटन नियोजन व बैठका व इतर संघटनात्मक बाबी*
(मार्गदर्शक : तानाजी सोमवंशी, जिल्हाध्यक्ष, मराजूपेहसं, लातूर)

👉🏿 *जिल्ह्यात पोस्टर वार/ट्विटर वार मोहीम राबवणेबाबत.*
(मार्गदर्शन : श्री. तुळशीदास धडे सर, सरचिटणीस, मराजूपेहसं, लातूर)

👉🏻 *मोर्चासाठी आर्थिक तरतुद नियोजन*
(मार्गदर्शक : ज्ञानेश्वर गवरे सर, जिल्हा सल्लागार, मराजूपेहसं, लातूर)

👉🏿 *कै. बंडू वाघमारे सर यांना मदतनिधी व इतर मदत*
(मार्गदर्शन: श्री. राहुल रोकडे सर, कोषाध्यक्ष, मराजूपेहसं, लातूर)

👉🏻 *मोर्चासाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर कायदेशीर बाबी...*
(मार्गदर्शक : इस्माईल शेख सर, कार्याध्यक्ष, मराजूपेहसं, लातूर)

👉🏻 *मोर्चापुर्व प्रसिद्धी व मिडीया मॅनेजमेंट*
(मार्गदर्शक : लक्ष्मण बेंबडे सर, प्रसिद्धी प्रमुख, मराजूपेहसं, लातूर)

👉🏻 *सोशल मिडीयाद्वारे मोर्चासाठी वातावरण निर्मीती*
(मार्गदर्शक : शशिकांत नाबदे सर, सोशल मिडीया प्रमुख, मराजूपेहसं, लातूर)

👉🏿 *ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे.*

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

~_*तरी लातूर पेन्शन टिमचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, जिल्हा प्रतिनीधी, तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारणी सदस्य तसेच सर्व dcps धारकांनी वरील बैठकीस उपस्थित रहावे ही विनंती. बैठकीत घेतले जाणारे निर्णय सर्वांना बंधनकारक असतील.*_~

 ======= बैठक विनीत =======

*समस्त महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन, लातूर*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

नवनियुक्त औसा कार्यकारणीचे अभिनंदन

*अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी मरण आल तरी चालेल*
*कारण तुमची भावी पीढी तुमच्या मृत्यु चा बदला घेईल ..*

*परंतु अन्याय सहन करून मराल तर तुमची भावी पिढी तुमच्या प्रमाणे गुलामच होईल*
     
     *- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
=================
_2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मच्याऱ्यावर शासनाने चालवलेल्या अन्यायाला तीव्र प्रतिकार करण्यासाठी म रा जूनी पेंशन हक्क संघटण औसा शाखेचा विस्तार करण्यात आला..._
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
_औसा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटणेचे पदाधिकारी..._
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*राज्य विश्वस्त म रा जु पें हक्क संघटन*
     *श्री अमोल शेळके*

 जिल्हा कोषाध्यक्ष
*श्री राहुल रोकडे*

 जिल्हा मुख्यसंघटक
*श्री परमेश्वर रोळे*

         मार्गदर्शक:
*श्री दत्तात्रय रत्नपारखे*
*श्री संदीप पंतोजी*
====+=++=====

 *तालुका कार्यकारणी औसा*
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
*म रा जु पे हक्क संघटन*
 *संपर्क प्रमुख*
       
     🌺मातोला🌺
   *श्री संदीप डाके*

       🌸 सेलू 🌸
*श्री अतुल क्षिरसागर सर*

      🏵औसा🏵
  *श्री गोविंद कोल्हे*
       
    🌻आपचुंदा🌻
      *श्री भूरे सर*

    🌼 लोदगा🌼
  *श्री शाम भोपे सर*

  🌷 तांबरवाडी🌷
  *श्री अनिल पवार*
 
   🌷जवळगा पो.🌷
 *श्री सुरेश गायकवाड़*

       🏵आशिव 🏵
*श्री अविनाश*
      *पप्पूलवाड सर*

        🌸नांदुर्गा🌸
   *श्री संजय तुरिवाले*

         🏵सेलू🏵
  *श्री अतुल क्षिरसगर*

      🌷खरोसा🌷
    *श्री खेळगे सर*

      💐शिवली💐
 *श्री शाम क्षिरसागर*

        🤝खरोसा🤝
 *श्री विक्रम राउतराव*
       
        🤝संस्था 🤝
   *श्री नन्ना बस्वराज*
   
      ☘ उपाध्यक्ष☘
 *श्री इज्जपवार प्रदीप*

     🌳 उपाध्यक्ष🌳               
    *श्री अतुल मोरे*

   🌴 *कार्याध्यक्ष*🌴
   *श्री शेखर जाधवर* 

        🍃सचिव🍃
      *श्री महेश मोरे*

     🌺कोषाध्यक्ष🌺
   *श्री किशोर फुटाने*

   ✍मिडिया प्रमुख✍
   *श्री बार्हाळे यादव*

🤝एकजुटिकरण प्रमुख🤝
    *श्री सुरेश गट्टूवार*

  ✊ मुख्य संघटक✊
*श्री सचिन कांबळे सर*

   🤝 संपर्क प्रमुख👏
  *श्री ब्रम्हानंद तिरुके*

🍀 संस्था विभाग प्रमुख🍀
     *श्री वाघमारे सर*

      🌿सल्लागार🌿
    *श्री मोतेवाड सर*
       
    🍁 प्रसिद्धि प्रमुख🍁
    *श्री अमित गुडे सर*
       
      ✍सह सचिव✍
   *श्री सतीष भुजबळ*

नूतन कार्यकारनीचे हार्दिक अभिनंदन!!!!
💐💐💐💐💐💐
       सदैव आपलाच
      श्री महादेव बुरांडे
          तालुकाध्यक्ष
म रा जु पें हक्क संघटन औसा
👏👏👏👏👏👏

जूनी पेन्शनसाठी २७ जानेवारीला लातूरमध्ये होणार "हल्लाबोल" आंदोलन

जूनी पेन्शनसाठी २७ जानेवारीला लातूरमध्ये होणार "हल्लाबोल" आंदोलन

दि.१४ जानेवारी,लातूर
         महाराष्ट्रातील सर्वात मोठी कर्मचारी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनची जिल्हास्तरीय बैठक आज लातूरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत दि.२७ जानेवारीला लातूरमध्ये जूनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकार विरोधात "हल्लाबोल" आंदोलन घेण्याचे एकमताने ठरले.
         'मागील तीन - चार वर्षापासुन महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटना जूनी पेन्शनच्या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने मागणी करीत आहे. त्यासाठी आतापर्यंत विविध आंदोलने, मोर्चे, धरणे देऊनही शासनाने या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पूढील काळात होणाऱ्या निवडणूका लक्षात घेता आता हा लढा अधिक व्यापक व तीव्र केला जाणार असून आता आरपारची लढाई लढण्याची वेळ शासनाने आमच्यावर आणलेली आहे' अशी माहिती या निमित्ताने संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी दिली.
       जर येत्या ७-८ दिवसात शासनाने याबाबतीत कोणताही ठोस निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर सर्व DCPS/NPS ग्रस्त बांधवांचे "हल्लाबोल आंदोलन" नियोजित आहे. त्याविषयीचे सविस्तर नियोजन संघटनचे राज्य समन्वयक प्रविण गिरी यांनी दिली. सदरील बैठकीस मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, सरचिटणीस तुळशीदास धडे, महिला आघाडी प्रमुख साबिया तांबोळी, कार्याध्यक्ष शेख इस्माईल, सल्लागार ज्ञानेश्वर गवरे, मुख्य संघटक परमेश्वर रोळे, मिडीया प्रभारी शशिकांत नाबदे, उपाध्यक्ष अर्जून चव्हाण, जिल्हा परिषद विभाग प्रमुख सदाशिव नवले, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, मतीन अब्बासी, अरुण जांभळे, महादेव बुरांडे यांच्यासह विजयसिंह मोरे, नागनाथ सुरवसे, महेश क्षीरसागर, दिनेश नरवणे, शरद पांचाळ, खंडू मुळे, केंद्रे सर, बोरोळे सर आदि पेन्शन फायटर उपस्थित होते.