Sunday, 13 January 2019

जूनी पेन्शनसाठी २७ जानेवारीला लातूरमध्ये होणार "हल्लाबोल" आंदोलन

जूनी पेन्शनसाठी २७ जानेवारीला लातूरमध्ये होणार "हल्लाबोल" आंदोलन

दि.१४ जानेवारी,लातूर
         महाराष्ट्रातील सर्वात मोठी कर्मचारी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनची जिल्हास्तरीय बैठक आज लातूरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत दि.२७ जानेवारीला लातूरमध्ये जूनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकार विरोधात "हल्लाबोल" आंदोलन घेण्याचे एकमताने ठरले.
         'मागील तीन - चार वर्षापासुन महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटना जूनी पेन्शनच्या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने मागणी करीत आहे. त्यासाठी आतापर्यंत विविध आंदोलने, मोर्चे, धरणे देऊनही शासनाने या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पूढील काळात होणाऱ्या निवडणूका लक्षात घेता आता हा लढा अधिक व्यापक व तीव्र केला जाणार असून आता आरपारची लढाई लढण्याची वेळ शासनाने आमच्यावर आणलेली आहे' अशी माहिती या निमित्ताने संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी दिली.
       जर येत्या ७-८ दिवसात शासनाने याबाबतीत कोणताही ठोस निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर सर्व DCPS/NPS ग्रस्त बांधवांचे "हल्लाबोल आंदोलन" नियोजित आहे. त्याविषयीचे सविस्तर नियोजन संघटनचे राज्य समन्वयक प्रविण गिरी यांनी दिली. सदरील बैठकीस मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, सरचिटणीस तुळशीदास धडे, महिला आघाडी प्रमुख साबिया तांबोळी, कार्याध्यक्ष शेख इस्माईल, सल्लागार ज्ञानेश्वर गवरे, मुख्य संघटक परमेश्वर रोळे, मिडीया प्रभारी शशिकांत नाबदे, उपाध्यक्ष अर्जून चव्हाण, जिल्हा परिषद विभाग प्रमुख सदाशिव नवले, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, मतीन अब्बासी, अरुण जांभळे, महादेव बुरांडे यांच्यासह विजयसिंह मोरे, नागनाथ सुरवसे, महेश क्षीरसागर, दिनेश नरवणे, शरद पांचाळ, खंडू मुळे, केंद्रे सर, बोरोळे सर आदि पेन्शन फायटर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment