Saturday, 29 June 2019

सातव्या वेतन आयोगाची सर्वच थकबाकी रोख हवी !

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*सातव्या वेतन आयोगाची सर्वच थकबाकी रोख हवी !*

💵💵💵💵💵💵💵💵💵💵
_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूरच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमुखी निर्णय..._
🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪🌪


```आज केशवराज विद्यालय, लातूर येथे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत बोलावलेली विशेष बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये जिल्ह्यातून असंख्य DCPS धारक बंधू उपस्थित होते. सर्वांच्या चर्चेतून खालीलप्रमाणे एकमुखी निर्णय घेण्यात आले.```

☝🏻 ```कोणत्याही परिस्थितीत सातव्या वेतन आयोगातील जानेवारी 2016 पासूनचा   DCPS धारकांचा फरक रोखीनेच मिळाले पाहिजे.```

☝🏻 ```प्रमाणित खाते नंबर नसणे, एकाच कर्मचाऱ्याचे तीन खाते नंबर असणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचार्‍यांचे खाते नंबर नसणे, बऱ्याच DCPS धारकांचे खाते नंबरच नसणे, अशा असंख्य त्रुटी आहेत.```

☝🏻 ```त्यामुळे जून २०१९ च्या मासिक वेतन देयकासोबत ७ व्या वेतन आयोगातील फरक DCPS खात्यावर जमा करण्यास नकार द्यायचा.```

☝🏻 ```प्रशासन सहकार्य करण्यास तयार नसल्यास त्याविरोधात आंदोलन पुकारले जाईल.```

☝🏻 ```दुष्काळी निधीसाठी एक दिवसाच्या पगार कपातीस लातूर जिल्ह्यातील सर्व DCPS / NPS धारक कर्मचारी व वरिष्ठ कर्मचारी बहिष्कार टाकतील. सदरील रक्कम कै. गोविंद शिरमवार सर यांच्या चिमुकलीच्या नावे मदतनिधी म्हणून जिल्ह्याच्या वतीने जमा करण्यात येईल.```

☝🏻 ```दि.०३ जूलै रोजी जूनी पेन्शनसाठी लक्षवेधी आंदोलन करुन त्याचा सोशल मिडीयावर प्रसार प्रचार करणे.```

☝🏻 ```चटोपाध्याय प्रस्तावाचे कार्य व अर्धनग्न आंदोलनातील सहभागासाठी जिल्हा टीमचे अभिनंदनपर ठराव संमत करण्यात आला.```


सदरील बैठकीस संघटनचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांच्यासह जिल्हासचिव मोरे विजयसिंह, सोशल मिडीया प्रमुख नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष महादेव गुजरे, सहकार्याध्यक्ष शरद पांचाळ, चाकूर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे, निलंगा तालुकाध्यक्ष राहूल मोरे यांच्यासमवेत जिल्ह्यातील बहुसंख्य पेन्शन शिलेदार उपस्थित होते.
        *सदरील बैठकीस आपल्या अमुल्य वेळ काढून संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहिलेल्या सर्व शिलेदारांचे मनपुर्वक आभार !!! मात्र काही कारणामुळे बैठकीस न येऊ शकलेल्या शिलेदारांची जबाबदारी असेल की त्यांनी सातव्या वेतन आयोगाची DCPS थकबाकी जून महिन्यातील बीलात मागवू देऊ नये. यासंदर्भातील प्रशासनाचे सविस्तर पत्र सोमवारी येईलच. तसेच जिल्हा परिषद भेटीचे सर्व अपडेट्स उद्या देण्यात येतील.*


~तोपर्यंत सर्वांना शुभरात्री !!!~
~मात्र पेन्शन मिळेपर्यंत आपणास सरकारची झोप उडवायची आहे, हे पक्के लक्षात ठेवा !!!~

✍🏻 *श्री. नागनाथ सुरवसे सर*
_जिल्हा सोशल मिडीया प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूर_

No comments:

Post a Comment