*DCPS / NPS कर्मचाऱ्यांची ७ व्या वेतन आयोग थकबाकी रोखीने देण्याचा शासन आदेशबाबत -*
*•••••••••••••••••••••••••••••••••••••*
_Post By - Tanaji Somwanshi MRJPHS Latur_
*•••••••••••••••••••••••••••••••••••••*
_दि. 30 मे 2019 रोजी आलेल्या या शासन आदेशातील ठळक बाबी अशा -_
👉🏻 १. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 कालावधीतील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ही समान 5 हप्त्यात दरवर्षी 1 जूलैला अशी 5 वर्षात देण्यात येईल.
👉🏻 *ज्यांची DCPS / NPS कपात नियमीत सुरु आहे -* त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नवीन बेसीकच्या (मुळ वेतन + महागाई भत्ता) १०% इतकी रक्कम DCPS / NPS खात्यात जमा व्हायला हवी. जी सहाव्या वेतन आयोगातील बेसिकप्रमाणे जमा झाली होती. याचा फरक वगळून उर्वरित रक्कम समान 5 हप्त्यात जमा होईल.
👉🏻 *ज्यांची DCPS / NPS कपात रक्कम नियमीत नाही -*
त्यांची आतापर्यंतची सहाव्या व सातव्या आयोगातील बेसिकच्या १०% कपात DCPS / NPS खात्यात जमा होईल. म्हणजे अशा कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम मिळण्याची शक्यता कमीच आहे. जर या अगोदरच काही कपात झाली असेल तर काही ठराविक रक्कम मिळू शकते.
👉🏻 *या कालावधीत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकी -* 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम सातव्या आयोगाप्रमाणे १० % कपात होऊन उर्वरित रक्कम रोखीने एकदाच त्यांच्या वारसांना मिळेल.
⚪ *कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या बाबी -*
👉🏻 *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनने* अगोदरपासूनच या संदर्भात निवेदने देऊन मागणी केली होती. त्याची दखल घेत शासनाने थकबाकी रक्कम रोख दिली, ही आनंदाची बाब आहे.
👉🏻 ज्यांची नियमीत कपात आहे, अशा कर्मचाऱ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होईल. यात शिक्षण विभाग वगळून इतर विभागाच्या कपाती नियमीत असल्याने त्यांना या शासन आदेशाचा सर्वात जास्त फायदा होईल. तसेच संबंधित सर्व विभाग आता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनसोबत जोडण्यास खूप मोठी मदत होईल.
👉🏻 जुन्या कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम ही त्यांच्या GPF खात्यावर व तेथून विशिष्ट कालावधीनंतर मिळणार मात्र DCPS / NPS कर्मचाऱ्यांना तात्काळ त्याचवर्षी रक्कम मिळेल, हाच सर्वात मोठा फायदा आपणास होईल.
⚫ *कर्मचाऱ्यांसाठी वाईट बाबी -*
👉🏻 संबंधित शासन आदेशातील ठराविक अटींमुळे ज्या कर्मचाऱ्यांनी आपली DCPS / NPS कपात बंद केली होती, त्यांची कपात नियमीत करुन घेऊन कोर्टामध्ये व कर्मचाऱ्यांवर संबंधित योजना थोपवण्याचा प्रयत्न १००℅ यशस्वी केला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांची कपातीची थकबाकी जमा करुन घेऊन कोर्टामध्ये शासनाची कमजोर असलेली बाजू सावरण्याचा प्रयत्न शासनाचा आहे.
*एकंदरीत विचार करता शासन आदेशाचे स्वागतच करायला हवे, मात्र यातील ठराविक अटी रद्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे.
✍🏻 *तानाजी सोमवंशी, जिल्हाध्यक्ष MRJPHS लातूर*

No comments:
Post a Comment