Tuesday, 21 May 2019

कै.बंडू वाघमारे सर मदतनिधी वितरण सभा




*_!!! स्तब्ध मी !!!_*
            *_!!! सुन्न मी !!!_*
                      *_!!! नि:शब्द मी !!!_*
_भांबावल्या भयाण रात्री_
_केली भावनांची शिदोरी गोळा...._
_नाजूक माझ्या भावनांची शिदोरी_
_भयाण रात्रीही धीर देईल थोडा..._
*_डोळ्यांच्या कडा नकळत पाणावणारी ऱ्हदयस्पर्शी सभा..._*
_कै. बंडू वाघमारे सर यांच्या चिमुकल्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने व्हाट्स अपद्वारे जाहीर आवाहन करुन मदतनिधी जमा करण्यात आला होता. तो किती जमा झाला, कोणी जमा केला हा विषय गौण असून सरांच्या पश्चात त्यांच्या चिमुकल्यांची स्वप्ने साकार करण्यात कोठेतरी खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य आपणा सर्वांच्या सहकार्याने मराजूपेह संघटनला लाभले. खरेतर ही पैशांची मदत नव्हतीच, मदत होती ती आपल्या सर्वांच्या भावनांची..._
         _आज एखादा DCPS / NPS कर्मचारी मृत पावला तर त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था होते, त्याच्या चिमुकल्यांचे भवितव्य काय ? हा गहन प्रश्न कोणत्याही संवेदनशील नागरिकाला अनुत्तरीतच करतो. याच संवेदनशीलतेने तब्बल कै. बंडू वाघमारे सर यांच्या दोन चिमुकल्यांच्या नावाने ८०,०००/- (४०,००० + ४०,०००) पूढील १७ वर्षासाठी FD करुन (१७ वर्षानंतर चौपट रक्कम म्हणजे ३,२०,०००/-) त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी सरांच्या आठवणी व आपण सर्वांनी दिवेला भावनिक धीर यामुळे थोडावेळ वातावरण अधिक भावनिक झाले, उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या._
       _या सर्व कागदोपत्री प्रक्रियेसाठी दोन - तीन महिने कालावधी जरी लागला असला तरी आपण सर्वांनी दिलेली भावनिक मदत १७ - १८ वर्षानंतरही स्मरणात राहील. या सर्व प्रक्रियेत ज्या ज्ञात / अज्ञात हात लागले त्या सर्वांचे आभार. सरांच्या मदतनिधीसाठी म.गांधी चौक येथील हल्लाबोल आंदोलनात श्री.संतोष सुर्यवंशी सर यांनी उत्स्फूर्तपणे आगळी वेगळी वेशभूषा करत 5,240रु. निधी जमवला, *त्यांच्या समर्पण भावनेला सलाम !!!* तसेच देवणी तालुकाध्यक्ष श्री. संतोष पाटील सर जवळजवळ दोन महिने या पुर्ण कागदोपत्री प्रक्रियेसाठी उन्हातान्हाची पर्वा न करता फिरले, *त्यांच्या कार्याला सलाम !!!* तसेच केवळ व्हाट्स अप द्वारे आवाहन करुन आपण सर्वांनी केलेल्या *मदतरुपी दातृत्वाला सलाम !!!*_
```सदरील सभेसाठी देवणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. कुळकर्णी साहेब, संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी, पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी सर, सरचिटणीस तुळशीदास धडे सर, जिल्हा उपाध्यक्ष विकी येलमट्टे सर, जिल्हा समन्वयक गोविंद पतंगे सर, देवणी तालुकाध्यक्ष संतोष पाटील सर, चाकूर तालुकाध्यक्ष श्री. संतोष पाटील सर (सरांनी वैयक्तिक पातळीवर १४,०००/- रु. मदतनिधी जमा केला.) व संघटनचे उपस्थित अनेक शिलेदार या सर्वांचे आभार !!!```
_वो जितने अंधेरे लाएंगे,_
मैं उतने सूर्य उगाऊँगा,
_वो जितनी रात बढ़ाएंगे,_
मैं उतने उजाले लाउंगा,
_इस छल फरेब की आँधी में,_
मैं दीप नहीं बुझने दूंगा,
_हमे पुरानी पेन्शन लेने की जिद् हैं_
इसे लिए बिना चूप नहीं बैठूंगा!
*_विनीत, समस्त महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लातूर_*

No comments:

Post a Comment