Saturday, 19 January 2019

रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क*
 *संघटन रेणापूर जिल्हा लातूर*
   रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार व सहविचार सभा उत्साहात संपन्न
          👊🏻 *_सर्व विभाग समाविष्ट असणारी लातूर जिल्ह्यातील पहिली तालुका कार्यकारिणी..!!!_*
सदरील बैठकीतील निवडी खालील प्रमाणे👇🏻
*●तालुका सरचिटणीस-श्री.मारुती खरटमोल सर(शिक्षण विभाग)*
*●कार्याध्यक्ष-श्री.रमेश आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*●कोषाध्यक्ष-श्री.गणेश इस्थळकर साहेब(ग्रामसेवक)*
*●उपाध्यक्ष-भुसणर डी.बी.साहेब(तलाठी महसूल विभाग)*
*●प्रसिद्धी प्रमुख-श्री.प्रमोद कटके सर(शिक्षण विभाग)*
*●संघटक-सुंदर कदम सर (खाजगी संस्था)*
*●महिला आघाडी प्रमुख -देशमुख एस.एम.मॅडम*
*●मार्गदर्शक-श्री.कुलूलवाड सुरेश सर*
*●सल्लागार-दुड्डे प्रेमराज सर*
         
      सदरील बैठकीसाठी *श्री.अमोल शेळके(विश्वस्त),सचिन चव्हाण(विभागीय उपाध्यक्ष),तानाजी सोमवंशी(जिल्हाध्यक्ष), तुळशीदास धडे (सरचिटणीस),इस्माईल शेख(कार्याध्यक्ष),राहुल रोकडे(कोषाध्यक्ष),शशिकांत नाब्दे (सोशल मीडिया प्रभारी)हे उपस्थित होते.*

*👉🏻नवीन पेन्शन योजनेचे तोटे कसे आहेत याची आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी श्री दत्तात्रय रत्नपारखे सर यांनी केली.*

■विशेष उपस्थिती 👇🏻
*◆के.बी.बनसोडे साहेब(कार्यालयीन अधीक्षक,कृषी विभाग)*
*◆तिडके साहेब (तालुकाध्यक्ष तलाठी संघटना)*
*◆औसेकर साहेब(तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना)*
*◆आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*◆कोरे साहेब(तालुकाध्यक्ष  कास्ट्राईब संघटना)*
*◆करवंजीकर साहेब(अकाऊंट विभाग तहसील रेणापूर)*
*◆फुटाणे साहेब(तालुकाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना)*
          विशेष म्हणजे वरील सर्व संघटनेचे पदाधिकारी हे dcps/nps धारक असून आपापल्या संघटनेचे नेतृत्व करतात.
*सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस मारुती खरटमोल यांनी केले.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
आपलेच 🙏🏻
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रेणापूर जिल्हा लातूर*

२३/१० च्या जी.आर. लवकरच रद्द करु


"२३/१० च्या जी.आर. लवकरच रद्द करु" शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे जूनी पेन्शन हक्क संघटन शिष्टमंडळाला आश्वासन

काल शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या वेळेनुसार सकाळी ठीक ०८.०० वाजेपासूनच पेन्शन हक्क संघटनचे शिलेदार "शासकीय विश्रामगृह, लातूर" येथे उपस्थित राहिले. विनोद तावडे साहेबांनी बरोबर ०८.३० ला भेटीसाठी आपल्या शिष्टमंडळाला पाचारण केले. यावेळी शिष्टमंडळाने विनोद तावडे साहेबांना २३/१० च्या वरीष्ठ वेतनश्रेणीचा शासन निर्णय रद्द करण्याचे निवेदन दिले. व त्याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी साहेबांनी हा शासन आदेश रद्द करु असे आश्वासन दिले. यावेळी "साहेब, अशी आश्वासने आम्हाला पुष्कळ मिळाली, मात्र महाराष्ट्रातील समस्त शिक्षक अजूनही शासन निर्णयाची वाट पाहतच आहेत." त्यावर शिक्षण मंत्र्यांनी सांगितले,"आता जास्त वाट पहावी लागणार नाही." असे उत्तर दिले.
       सदरील भेटीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण सर व जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी केले. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे सर, रेणापूर तालुकाध्यक्ष अरुण जांभळे, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे सर, जिल्हा कोषाध्यक्ष राहुल रोकडे सर, जिल्हा संघटक परमेश्वर रोळे सर, जिल्हा प्रतिनिधी दिनेश नरवणे सर, दत्ता यादव सर, मोरे विजयसिंह सर, दत्तात्रय बेद्रे सर, संतोष सुर्यंवशी सर आदि पेन्शन फायटर उपस्थित होते.

१८ जानेवारी जिल्हा बैठक वृत्तांत

☝🏻 *बैठक वृत्तांत...* ☝🏻

*_महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लातूर_*

_दि.१८ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने पूढील निर्णय घेण्यात आले._

```१. कै. बंडू वाघमारे सर यांच्या मदतनिधीचा आढावा घेऊन त्यासाठी आणखी प्रयत्न करावे.```

```२. उर्वरित तालुक्यांनी लवकरात लवकर तालुका विस्तार व आंदोलनासाठी तालुकास्तरीय बैठक आयोजित कराव्यात.```

```३. ज्या तालुक्यांना त्यांच्या अंतर्गत शहरासाठी कार्यकारणी करायची असेल त्यांना अशी कार्यकारणी करायची परवानगी असेल. सदरील कार्यकारणीस तालुका कार्यकारणी नियुक्ती देईल व शहर कार्यकारणी तालुका कार्यकारणीच्या नियंत्रणात व नियोजनात कार्य करेल.```

```४. सर्व तालुका कार्यकारणींनी सर्व लेखी अभिलेखे ठेवावीत, त्यासाठी "कार्यालयीन सचिव" पद नेमण्यात यावे.```

```५. "ट्विटर वार"ला आणखी गती देऊन त्याचा तालुकावार आढावा घेण्यात आला. प्रत्येक शिलेदारास वैयक्तीक मार्गदर्शन करुन प्रत्येक शिलेदाराने दररोज ३ tweet करावेत.```

```६. २७ जानेवारीचे हल्लाबोल आंदोलन हे जनआंदोलन होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.```

```७. ३ फेब्रुवारीच्या अमरावती अधिवेशनासाठी जाणाऱ्यांसाठी २ फेब्रुवारीला पहाटे ०४.०० वाजता लातूर येथून ट्रेन असून त्याची बुकींग उपलब्ध आहे. इतरांनी तालुका / केंद्र स्तरावर नियोजन गाड्यांचे नियोजन करुन तालुका कार्यकारणीस कळवावे.```

*_तुमचे, माझे, सर्वांचे हक्काचे संघटन_*
*_महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटन_*
~~~~~~~~~~~~~~~~~~~