Saturday, 10 August 2019

उत्तम, उत्कृष्ट, उत्साहवर्धक


*उत्तम, उत्कृष्ट, उत्साहवर्धक...*
-------------------------------------------
*औसा तालुक्याच्या इतिहासात राज्य कर्मचारी समन्वय समिती बैठकीस प्रथमच मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद...* ✊🏻
-------------------------------------------
✍🏻 तानाजी सोमवंशी 9011104464
_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूर_
-------------------------------------------
*कहते हैं, अगर किसी चीज को दिल से चाहो...*
*तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश में लग जाती हैं...*
            _तीव्र इच्छाशक्ती, जिद्द व पेन्शन प्रती प्रचंड तळमळीच्या जोरावर केवळ एक दिवस अगोदर नियोजन करण्यास सांगूनही कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या *महादेव बुरांडे* या ध्येयवेड्या शिलेदारास माझा सलाम !!!_ 👏🏻👏🏻👏🏻
        ```शुक्रवारी महादेवाचा फोन आला, 'जिल्हाध्यक्ष आम्ही औशाला समन्वय समिती बैठकीचे नियोजन करावे का ?' मी सांगितले काही हरकत नाही. पण दूसरा शनिवार, रविवार व सोमवार या दिवशी सुट्टी आणि मंगळवारी निलंगा येथे नियोजन होत आहे, तुम्ही बुधवारी घ्या.' पण ऐकेल तो महादेवा कसा. तो म्हणाला 'नाही, मी उद्याच नियोजन करतो. सर्वात अगोदर बैठक ही औशालाच झाली पाहिजे.'आणि त्याने यशस्वी नियोजन करुन दाखवून सुध्दा दिले.```
        _दुसऱ्या शनिवारी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना सुट्टी असूनही व नियोजनासाठी फक्त एकच दिवस असूनही या ध्येयवेड्या शिलेदाराने रात्री अकरा पर्यंत सर्व संघटना पदाधिकारी यांना फोन केले. शनिवारी परत सर्व नियोजन करत तब्बल २५ - ३० संघटनांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वादळी बैठक घेऊन औसा तालुक्यातील २० ऑगस्टचा संप १००% यशस्वी होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही._
        *बैठकीस उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी यांचे मनपुर्वक आभार. कारण जूनी पेन्शन विषयासाठी स्वतंत्रपणे लढण्यातच संघटना पूढाकार घेतात मात्र एकत्रित संयुक्त नियोजन असल्यास त्याकडे पाठ फिरवतात, हा गैरसमज आपण मोडून काढलात. विशेषतः औसा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी न चूकता उपस्थित होते, ही इतर तालुक्यातील संघटना पदाधिकारी यांच्यासाठी आदर्शवत बाब आढळली. तसेच इतर विभागातील पदाधिकारी, मध्यवर्ती कर्मचारी संघटना पदाधिकारी यांचेही आभार. मित्रांनो, संप तर यशस्वी करायचाच आहे. त्यासाठी पेन्शन टीम लातूर अहोरात्र झटत आहेच. सोबत आपणासही शक्य ती मदत करायची आहे. महत्वाचे आपल्या तालुक्यात समन्वय समिती बैठक झालीच पाहिजे, हा आग्रह करा. यामुळे तालुक्यात लगेच वातावरण निर्मीती होऊन जाते. आपल्या काही सूचना, समस्या आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत, त्या अवश्य कळवाव्यात.*
*~तू न थकेगा कभी,~*
*~तू न रुकेगा कभी,~*
*~तू न मुड़ेगा कभी,~*
*~कर शपथ, कर शपथ, कर शपथ,~*
*~अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।~*
*समस्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवार लातूर*

No comments:

Post a Comment