Thursday, 28 February 2019

*वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रस्ताव लवकरच निकाली काढू...* ✊🏻

*वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रस्ताव लवकरच निकाली काढू...* ✊🏻

~*_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विपीन इटनकर साहेबांचे आश्वासन_*~ 👊🏻

_सर्व शिक्षक बंधू भगिनींना पेन्शनमय नमस्कार...._ 🙏

```शिक्षण खात्याअंतर्गत प्रमोशन नसल्याने शिक्षकांना १२ व २४ वर्षानंतर वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी दिली जाते. मात्र 23/10/2017 च्या शासन निर्णयानुसार विविध अटी घालून मागील दिड वर्षापासुन प्रस्ताव मंजुरी रखडली होती. शिक्षक शाळेवर आपले कर्तव्य तन मन धनाने पार पाडत आहेत मात्र विशिष्ट शासन निर्णयाचे कारण दाखवून गेल्या दिड वर्षापासुनचे प्रस्ताव अपात्र ठरवणे हा शिक्षकांच्या कर्तव्यावर गदा आणल्यासारखे  झाले आहे, हा विषय साहेबांना पटला. लागलीच आम्ही 23/10/2017 चा व 21/12/2018 चा शासन आदेश दाखवून त्यातील सर्व मुद्दे साहेबांनी वैयक्तीकपणे पाहिले. व त्यावर सकारात्मक भूमिका घेत विविध शंका विचारल्या, त्यावर आपल्या टीमच्या अभ्यासपुर्ण अशा सहकार्याने सादरीकरण मला करता आले.  साहेबांनी अगदी व्यस्त वेळेतून   20-25 मिनीटे या विषयावर चर्चा केली. यावर "तात्काळ कार्यवाही करावी" असा शेरा लिहला. व लवकरच "शिक्षण विभागासोबत" यावर बैठक घेऊन तुमच्या सातव्या वेतन आयोगाचे fixation याप्रमाणेच करु, असे आश्वासन दिले.```
           _निवेदन देताना फोटोचा आग्रह केला असता फोटोपेक्षा वेतनश्रेणीचे आदेश घ्या, असे विनोदी उत्तर दिले. शिक्षणाधिकारी जामदार मॅडमनी हा प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले. सदरील कामासाठी विविध कागदपत्रे व शासन आदेश जमा करण्याकामी जिल्हा सल्लागार श्री. ज्ञानेश्वर गवरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा सरचिटणीस तुळशीदास धडे, जिल्हा का.सचिव विजयसिंह मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा खास यासाठी जळकोटहून आलेले नवनाथ जाधव, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे, लातूर तालुकाध्यक्ष मतीन अब्बासी, लातूर शहराध्यक्ष प्रताप माने, औसा शहर सरचिटणीस बस्वराज नन्ना, शरद पांचाळ, जगदिश केंद्रे यांच्यासह अनेक पेन्शन फायटर (सर्वांची नावे लिहीणे शक्य नाही) उपस्थित होते._
          ~सर्व बांधवाना विनंती आपले प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेमध्ये जमा करावेत, ही विनंती...~

                         _सदैव आपलाच_
_तानाजी सोमवंशी ९०१११०४४६४_
    _जिल्हाध्यक्ष, MRJPHS लातूर_

Wednesday, 23 January 2019

ताई, येताय ना; पेन्शनच वाण लुटायला...

*_ताई, येताय ना; पेन्शनच वाण लुटायला... ?_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*~ताई, यायलाच लागतय...~*
*~पेन्शनच वाण लुटालयाच लागतय...~*
*~उतणार नाही, मातणार नाही !~*
*~पेन्शनचा वसा सोडणार नाही !!!~*

~~~~~~~~~~~~~~~~~~~

✍🏻 _A Post by तानाजी सोमवंशी_
*महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन, लातूर*
https://bit.ly/2ToIl5i

     ```मकरसंक्रांतीचा सण नुकताच येऊन गेला आणि महिला वर्गात संक्रातीचे वाण लुटायची लगबग सुरु झाली...```

```पण, ताई लक्षात असू द्या...```

```पेन्शनचही वाण लुटायला जायचय...```

_जस एखाद्या मैत्रीणीने, परिचीताने आपणास आग्रहाने निमंत्रण दिले, तर ते आपण टाळतो का ?_

```नाही ना...```

*मग पेन्शनच वाणही असच आहे. न टाळण्यासारखच...*

_आपण आपला संसार, कुटुंब, नातलग आणि नोकरी यात इतके व्यस्त असतो की, आपल्या वैयक्तिक हक्कावर घाला घातला जातोय, आणि आपण तो निमुटपणे सहन करतोय..._

पण किती दिवस...

यामुळेच तर अन्याय करणारी व्यवस्था मुजोर होत चाललेय...
आणि आपली मानसिकताही सोशिक होत चाललेय...

```आपल्या डोळ्यांदेखत आपल्या भावा - बहिणींचे संसार उध्वस्त होत आहेत, आपणही त्यांना व्हाट्स अपवर "भावपूर्ण श्रद्धांजली" अर्पण करतोय. कधी कधी १०० - ५०० मदतही करतोय. आणि हे सरकार सुध्दा त्यांना वाऱ्यावर सोडून झोपेच सोंग घेतय ! पण पूढे काय??? दुःखाला कवटाळल्याने पोटाची खळगी भरेल काय? आपल्या १०० - ५०० च्या मदतीने त्यांच्या मुलाबाळांची इंजीनियरींग, मेडीकलची फी भरणे होईल काय ?```

_का आम्ही इतके निर्ढावलेले आहोत ? कदाचित हे संकट आपल्यापर्यंत यायची वाट तर पाहत नाही ना ?_

```एकदा का पूढील महिन्यात निवडणूका झाल्या की मग त्यानंतरची चार वर्षे आपल्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. म्हणूनच आपणास हा लढा तीव्र करायचा आहे. आणि लढा तोच मोठा बनतो, ज्यात महिला वर्गाची लक्षणिय उपस्थिती असते. म्हणून विनवतोय,``` *आपल्या कुटुंबियांसह या मोर्चात नक्कीच सामील व्हा...*

*_एक लढली ती सावित्री_*
*_जिने तोडली बंधने गुलामीची..._*
*_आताही लढतेय आधुनिक सावित्री_*
*_जी तोडेल बंधने या अन्यायाची..._*

~*_चलो लातूर, चलो लातूर, चलो लातूर_*~
~*_आपल्या हक्कासाठी, आपल्या कुटुंबासाठी_*~

~*_|| एकच मिशन, जुनी पेन्शन ||_*~

*======================*
*भव्य हल्लाबोल आंदोलन*
*गांधी चौक, लातूर*
*दि.२७ जानेवारी रविवार*
*सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत*
*======================*

आयोजक - समस्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवार लातूर

Monday, 21 January 2019

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रेणापूर जि. लातूर
 

रेणापूर तालुका कार्यकारिणी विस्तार व सहविचार सभा उत्साहात संपन्न
          👊🏻 *_सर्व विभाग समाविष्ट असणारी लातूर जिल्ह्यातील पहिली तालुका कार्यकारिणी..!!!_*
सदरील बैठकीतील निवडी खालील प्रमाणे👇🏻
*●तालुका सरचिटणीस-श्री.मारुती खरटमोल सर(शिक्षण विभाग)*
*●कार्याध्यक्ष-श्री.रमेश आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*●कोषाध्यक्ष-श्री.गणेश इस्थळकर साहेब(ग्रामसेवक)*
*●उपाध्यक्ष-भुसणर डी.बी.साहेब(तलाठी महसूल विभाग)*
*●प्रसिद्धी प्रमुख-श्री.प्रमोद कटके सर(शिक्षण विभाग)*
*●संघटक-सुंदर कदम सर (खाजगी संस्था)*
*●महिला आघाडी प्रमुख -देशमुख एस.एम.मॅडम*
*●मार्गदर्शक-श्री.कुलूलवाड सुरेश सर*
*●सल्लागार-दुड्डे प्रेमराज सर*
           
      सदरील बैठकीसाठी *श्री.अमोल शेळके(विश्वस्त),सचिन चव्हाण(विभागीय उपाध्यक्ष),तानाजी सोमवंशी(जिल्हाध्यक्ष), तुळशीदास धडे (सरचिटणीस),इस्माईल शेख(कार्याध्यक्ष),राहुल रोकडे(कोषाध्यक्ष),शशिकांत नाब्दे (सोशल मीडिया प्रभारी)हे उपस्थित होते.*

*👉🏻नवीन पेन्शन योजनेचे तोटे कसे आहेत याची आपल्या खास शैलीत अभ्यासपूर्ण मांडणी श्री दत्तात्रय रत्नपारखे सर यांनी केली.*

■विशेष उपस्थिती 👇🏻
*◆के.बी.बनसोडे साहेब(कार्यालयीन अधीक्षक,कृषी विभाग)*
*◆तिडके साहेब (तालुकाध्यक्ष तलाठी संघटना)*
*◆औसेकर साहेब(तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना)*
*◆आलापुरे साहेब(कृषी विभाग)*
*◆कोरे साहेब(तालुकाध्यक्ष  कास्ट्राईब संघटना)*
*◆करवंजीकर साहेब(अकाऊंट विभाग तहसील रेणापूर)*
*◆फुटाणे साहेब(तालुकाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना)*
          विशेष म्हणजे वरील सर्व संघटनेचे पदाधिकारी हे dcps/nps धारक असून आपापल्या संघटनेचे नेतृत्व करतात.
         *सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस मारुती खरटमोल यांनी केले.*
➖➖➖➖➖➖
आपलेच 🙏🏻
*श्री.अरुण जांभळे*
    (तालुकाध्यक्ष)