Sunday, 1 September 2019

जुनी पेन्शनबाबत सरकार सकारात्मक ! - मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुनी पेन्शनबाबत सरकार सकारात्मक ! - मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लातूर: आज दिनांक 1 सप्टेंबर  2019 रोजी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त लातूर येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस संबोधीत करणार असल्याची माहिती मिळाली.
            यावेळी त्यांना जुनी पेंशन मागणी व 9 सप्टेंबर रोजीच्या संपासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्याचे ठरले. मात्र यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी लातूर बाहेर असल्याने समजले. त्याचवेळी त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, "मी नसलो, तरी बाकीचे सर्व नियोजन मी लावतो." पण तानाजी शिवाय कसे नियोजन लावायचे हा प्रश्न पडलेला असतानाच  "तुमचा बाप इथे मरुन पडलेला असताना तुम्ही पळून जाणार काय ?" हे कोंढाण्यावरील ऐतिहासिक शब्द कानावर आले. व सर्व शिलेदारांनी स्वयंस्फूर्तीने कामाला लागले. यात अहमदपूर टीमचे कौतुक करावे लागेल. त्यातल्या त्यात प्रा. एन. टी. बिरादार सर या पेन्शन शिलेदाराचे.
           ठरल्याप्रमाणे आम्ही रेस्ट हाऊसवर जमा झालो. मात्र शासकीय विश्रामगृह येथे अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फक्त पत्रकार व vip पास धारकांनाच आत प्रवेश करण्यास अनूमती देण्यात आली होती. जवळ जवळ चार चेक पोस्ट उभारण्यात आले होते.

        महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार सकाळी 8 वाजल्या पासून मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी प्रयत्न करीत होते, दोन वेळा शेवटच्या चेक पोस्टहुन आम्हास परत करण्यात आले होते कारण नियोजन अचानक झाल्याने आमच्याकडे vip पास नव्हते.

        परंतु हार मानतील ते पेन्शन शिलेदार कसले ? अखेर तीन तासाच्या या प्रयत्नाला यश आणून दिले ते लोकप्रिय आमदार श्री विनायकराव पाटील साहेबांनी! शेवटचा काहीच वेळ शिल्लक असताना त्यांनी थेट मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात आमच्यातील काही पेन्शन शिलेदारांना चक्क हाताला पकडून सोबत घेऊन गेले व मयत dcps धारकावर होणार अन्याय स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांसमोर मयत dcps धारकांची व्यथा सांगणारा  आमदार निराळाच. याचवेळी प्रा. एन. टी. बिरादार सर यांनी DCPS / NPS बद्दल तरुण कर्मचार्‍यांमध्ये खूप रोष असल्याचे मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी साहेबांनी आमचे सरकार यावर सकारात्मक विचार करत अाहे, असे आश्वासन दिले.
        यावेळी प.स.सदस्य चाकूर श्री सज्जनकुमार लोनाळे यांची उपस्थिती होते. समवेत प्रा.एन टी बिरादार सर, औसा तालुकाध्यक्ष महादेव बुरांडे सर, श्री. एस.एस. तुरीवाले सर, श्री किशोर फुटाणे, श्री प्रमोद बिराजदार, श्री रवी भोसले, श्री बिराजदार पी.एस, श्री भोसले आर. पी. सर, जिल्हा समन्वयक श्री. प्रसादसिंह बयास सर, श्री परतवाघ सर, श्री. पाटील एस एस सर, श्री गिरी सर, श्री कराड सर, श्री हालके गंगाधर, जिल्हा सहसल्लागार श्री नवनाथ वाघमारे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संकेत गिरी आदी पेंशन शिलेदार यांची उपस्थिती होती.

           ✍🏻 *महादेव बुरांडे*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन लातूर*

Friday, 23 August 2019

कै. गोविंद शिरमवार सर मदतनिधी


कै. गोविंद शिरमवार सर यांच्या मुलीच्या नावे FD करण्यासाठी मदतनिधी -

1. कै. गोविंद शिरमवार सर (DCPS धारक) यांच्या मुलीच्या नावे FD करण्यासाठी मदतनिधी -

निलंगा तालुक्यातील येळनूर शाळेतील एक उमद्या मनाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक कै. गोविंद शिरमवार सरांच्या पश्चात त्यांच्या छोट्या दिदिला भविष्यातील एक शिदोरी म्हणून आपण संघटनच्या वतीने मदतनिधी जमा करुन ती दिदिच्या नावे पोस्टात Fix Deposit करणार आहोत. ती करण्यासाठी खालील खात्यावर रक्कम जमा करावी.

प्रमोद गुंडेराव गुंगे
(कोषाध्यक्ष, पेन्शन संघटन निलंगा)
खाते नंबर - 33199527864

IFSC Code - SBIN0020265
Branch - aurad shahajani

Linked mo.no. & Whats app no.
9730015207

••••••••••••••••••••••••••••••••••••••

सदरील दात्यांनी जमा केलेली मदतीची यादी दर तासाला अपडेट करुन https://mrjphslatur.blogspot.com/2019/08/blog-post_23.html?m=1 येथे ऑनलाईन पहावयास मिळेल.
*•••••••••••••••••••••••••••••••••••*

सर्व दात्यांना विनंती मदतनिधी खात्यावर जमा केल्यानंतर त्यांच्या whats app नंबर वर तसा मेसेज टाकावा. दर तासाला सदरील दात्यांची अपडेट यादी वरील लिंकवर  पहावयास मिळेल. तसेच पाच - सहा तासाने व्हाट्स अपवर देखील यादी प्रसिद्ध केली जाईल.
*•••••••••••••••••••••••••••••••••••*

*: सदैव - सतत - सर्वांसमक्ष :*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क  संघटन लातूर*
===================
🙏मदत निधी जमा यादी🙏
====================
1) तानाजी सोमवंशी सर 500 ₹

2) उत्तम रमेश वाळवे 300 ₹

3) अविनाश रमेशराव उत्सुर्गे 300 ₹

4) विजय मरेवाड सर 500 ₹

5) राहूल मोरे सर 500 ₹

6)जाधव के बी 300₹

7)गुंगे प्रमोद गुंडेराव 500₹

8)किचंबरे Hemant V 500₹

9)Dhawale sir korali300₹

10)नागनाथ सुरवसे सर 500₹

11)चापाले सर 500₹

12)अर्चना गुणवंत बिरादार 500₹

13)सोमनाथ पंढारे 500₹

14)परमेश्वर नड्डे 500₹

Wednesday, 21 August 2019

'भिक नको पण कुत्र आवर'

*१० लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे 'भिक नको पण कुत्र आवर' सारखे!*
🙀🙀🙀🙀🙀🙀🙀🙀

😓 आजच्या शासन आदेशातून स्पष्ट होणारे ठळक मूद्दे -

🎯 शासन आदेशानुसार DCPS योजना लवकरच NPS मध्ये रुपांतरीत होणार !

🎯 राज्य शासनाची NPS योजना केंद्राच्या धर्तीवर आधारीत आहे. मग तरीही त्यातील विशिष्ट मुद्दांना बगल देऊन राज्य शासन ही योजना राबवत आहे !

🎯 केंद्र शासन मृत NPS ग्रस्त कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना देते. आणि राज्य शासन फक्त १० लाख रुपये  देऊन रडक्याचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करतय !

🎯 १० लाख रुपये मिळणार ते ही फक्त सेवेच्या १० वर्षांपूर्वी मयत झालेल्या DCPS / NPS धारकांच्या कुटुंबियांनाच ! त्यानंतरचे रामभरोसेच !!

🎯 परंतु १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर करताना एवढे टप्पे आहेत की दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना डोळे पुसून मंत्रालयातील वित्त विभाग व शिक्षण विभागाचे खेटे घालावे लागणार ! घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या विधवा पत्नी किंवा वृध्द आई - वडीलांची  केलेली ही चेष्टा तर नसेल ना, हा येणारा काळच सांगेल !!
•••••••••••••••••••••••••••••••••••••

⭕सदरील शासनाचा निर्णयामागील हेतूवरच शंका आहे. जर मदत  द्यायचा नसेल तर
मदत देण्याचे ढोंग कशासाठी ?

⭕ सर्व कर्मचारी संघटनांना याविषयी एकच विनंती की या शासन आदेशाचे श्रेय घेण्यापेक्षा व शासनाची हुजरेगिरी करण्यापेक्षा सरकारला कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासाठी पूढील १० -१५ दिवसात आंदोलन किंवा संप केलाच पाहिजे, कारण मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्या या क्रुर चेष्टेपेक्षा इतर बाबी गौण आहेत. जर विश्वास नसेल तर अशा एखाद्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन पहावे.

⭕ जर या निवडणुकीपुर्वी कुटुंब निवृत्ती वेतन योजना मंजूर होत नसेल तर पूढच्या निवडणुकीत कर्मचार्‍यांच्या संघटनांचे २००५ पुर्वीचे व नंतरचे असे दोन गट समांतरपणे काम करतील. आणि यास आपणच जबाबदार असाल.

⭕ *सर्व कर्मचारी बांधवांनाही विनंती की आपण आपल्या संघटना पदाधिकारी यांना या सदरील शासन आदेशातील नियम  - अटी लक्षात आणून देऊन मृत DCPS / NPS धारक कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पुणे येथे होणाऱ्या दि.२५ ऑगस्टच्या राज्य कर्मचारी समन्वय समिती बैठकीत उपस्थित राहून हा लढा मजबूत करण्याची विनंती करावी. मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी आपण इतके नक्कीच करु शकतो.*

तानाजी सोमवंशी ९०१११०४४६४
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूर*